Akshardhara Book Gallery
Turn A Blind Eye ( टर्न अ ब्लाइंड आय)
Turn A Blind Eye ( टर्न अ ब्लाइंड आय)
Share
Couldn't load pickup availability
Author: Jefri Archur
Publisher: Mehta Publishing House
Pages: 320
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Savita Damale
जेफ्री आर्चर
टर्न अ ब्लाइंड आय
डिटेक्टिव्ह कहाणीचा विल्यम वॉरिक याच्या मनोवेधक कहाणीचा तिसरा भाग म्हणाने 'टर्न अ ब्लाइंड आय'. डिटेक्टिव्ह इन्स्पेक्टर पदावर पोचलेला विल्यम वॉरिक एका धाडसी मोहिमेवर आहे. त्याला 'अंडरकव्हर' म्हणून गुन्ह्याचा छडा लावायचं गुप्त काम करायचं आहे. : ते काम म्हणजे मेट्रोपोलिटन पोलीस दलातील भ्रष्टाचार उघडकीस आणणं. डिटेक्टिव्ह रिबेका पँखर्स्ट आणि निकी बेली यांच्यासह त्याचं पथक डिटेक्टिव्ह जेरी समर्सच्या मागावर आहे. या तरुण अधिकाऱ्याची जीवनशैली त्याच्या उत्पन्नाच्या मानाने खूपच ऐषारामी आहे. विल्यमच्या पथकातील एका सदस्याशी त्याचे वैयक्तिक संबंध येतात, तेव्हा त्या सर्व तपासातच मोठं विघ्न निर्माण होतंय की काय असं वाटू लागतं.
दरम्यानच्या काळात एका कुख्यात ड्रग्ज व्यवसायातील 'भाई' वर खटला सुरू होतो तेव्हा सरकार पक्षातर्फे विल्यमचे वडील आणि बहीण काम पाहू लागतात. तर विल्यमची पत्नी आणि त्याच्या जुळ्या मुलांची आई बेथ हिच्या जीवनात अचानक एक जुनी ओळखीची व्यक्ती परत येते. या व्यक्तीने आपल्या जीवनातील नवीन पान उलटलंय असं वाटतं खरं, पण ते खरंच उलटलेलं असतं का ?
अधिकारी जसजसे धागे जुळवू लागतात तसतसं विल्यमला कळू लागतं की भ्रष्टाचार हा आणखी खोलवर रूजला आहे आणि आपल्याला वाटलं त्यापेक्षा अधिक सहकारी मोहाला बळी पडून सोयिस्करपणे डोळेझाक करायला तयार असू शकतातलेखक : जेफ्री आर्चर
अनुवाद : सविता दामले
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस
