Akshardhara Book Gallery
Tushar Amrutache (तुषार अमृताचे)
Tushar Amrutache (तुषार अमृताचे)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pro. Dr. Ramakant Kolte
Publisher: Madhushree Publication
Pages: 202
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तुषार अमृताचे
जगायचं कसं, जगायचं कशासाठी, सार्थक कशात या प्रश्नांची उत्तरं या लेखांमधून वाचकाला मिळू शकतील. अर्थात त्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत थोर संतांनी, विचारवंतांनी, लेखकांनी, कवींनी. त्यांच्या त्या विचारांच्या आधारानं मीदेखील त्यांचं विश्लेषण माझ्या परीनं केलं आहे. संतांचे, विचारवंतांचे विचार हे अत्यंत मौलिक. एवढंच नाही तर ते विचार म्हणजे जीवनमूल्येच. ते स्वीकारून माणसानं आचरण केल्यास त्याचं सार्थकच होईल, यात थोडीही शंका वाटत नाही. त्याद्वाराच खरीखुरी शांती, समाधान, आनंद लाभेल हेही निश्चितच. हे विचार, त्यांचं चिंतन जीवनाचं पोषण करणारं मला वाटतं. शिक्षण, समाज, विज्ञान, अध्यात्म, इतिहास, राजकारण, काव्य याही विषयांवरचं हे चिंतन आहे. अर्थात त्याला थोरा-मोठ्यांच्या विचाराचं अधिष्ठान आहे. यातील विचार स्वतंत्रपणे माझे म्हणून आलेच आहेत असे नाही. त्यास त्यांच्या विचारांचा आधार आहे. त्यांचे अमृतासारखे विचारधनही प्रत्यक्ष मी उद्धृत केले आहेत. बहुतांश लेखांत ते वाचकाला आढळून येतील. त्यामुळेच या लेखनाला मौलिक असं भारदस्तपण लाभलं, असं म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही.
प्रकाशक. मधुश्री पब्लिकेशन
लेखक. प्रा. डॉ. रमाकांत कोलते
