Akshardhara Book Gallery
Ub Hi Mahitali (ऊब ही महीतली)
Ub Hi Mahitali (ऊब ही महीतली)
Couldn't load pickup availability
Author: INDRAJIT BHALERAO
Share
Publisher: ADITYA PRAKASHAN
Pages: 164
Edition: latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:----
ऊब ही महीतली
गुरुवर्य सुधीर रसाळ यांच्या नावात 'रसाळ' हा शब्द असला तरी, प्रथमदर्शनी ते कुठल्याच अंगानं रसाळ वाटत नाहीत. अत्यंत तर्कशुद्ध, तर्ककठोर असं त्यांचं वागणं, बोलणं आणि लिहिणं असतं. त्यामुळे माणसं त्यांच्या फार जवळ जात नाहीत. तेही फारसं कुणाला जवळ करत नाहीत. पण वरचं कठीण कवच भेदून ज्यांना त्यांच्या अंतरंगात प्रवेश करता आला, त्यांचा अनुभव काहीसा खालील संतवचनासारखा आहे... काटे केतकीच्या झाडा। आत जन्मला केवडा नारळ वरुता कठीण। परी अंतरी जीवन फणसाअंगी काटे । आत अमृताचे साठे तसं इतरांना बोचावं असं, गुरुवर्य सुधीर रसाळ यांच्या व्यक्तिमत्त्वात काहीही नाही; पण खास आकर्षित करून घेईल, असंही काही नाही. ज्यांना सखोल आणि सदसद्विवेकी विद्वत्तेचं आकर्षण आहे, अशी माणसं मात्र त्यांच्याकडं आकर्षित झाल्याशिवाय राहत नाहीत. एकदा तुम्ही त्यांच्या जवळ गेलात की, त्यांच्या अंतरंगातली माया अनुभवता येते. ही माया म्हणजे जणू मातीखालच्या मातीची ऊबच असते. मर्देकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, 'गोड ऊब ही महीतली' असंच म्हणावं लागेल. गुरुवर्य सुधीर रसाळ यांच्या या गोड ऊबेचा अनुभव घेण्याचं भाग्य मला लाभलं. हे लेखन म्हणजे त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न.
लेखक : इंद्रजित भालेराव
प्रकाशन : आदित्य प्रकाशन
