Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Udhavasta (उदध्वस्त)

Udhavasta (उदध्वस्त)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Laxman Mane

Publisher: Mehta Publishing House

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

उदध्वस्त

उद्ध्वस्त जीवनाच्या 'परिवर्तनवादाचा श्रीगणेशा' फिरस्त्यांच्या दुनियेत होऊ पाहतोय... ही समाधानाची गोष्ट. दारिद्र्य, निरक्षरता, बेकारी, बिमारी, बकालपणाच्या दुनियेतील माणसांची गंजलेली आयुष्ये आता उभारी धरू पाहत आहेत. त्यांनाही आता 'शिक्षणरूपी परीस' गवसला आहे. त्यांच्यावरील अन्याय कडेलोट करणारा... या अन्यायरूपी, अमंगळ छायेचे ग्रहण आता दूर होत आहे. 'उद्ध्वस्त जीवनाची' धग आता ज्वालारूपी बनत आहे... स्त्री वर्गाची दैना, मुलींचा जन्म, पुरुषी अहंकार-अन्याय-अत्याचाराला आता काही प्रमाणात का होईना या 'कथारूपी कलशातून' तिलांजली मिळालीय, असे म्हणावेसे वाटते; कारण या 'कथारूपी कलशातील' पावित्र्याचे, मांगल्याचे शिक्षणरूपी तुषार समाजमनावर निश्चितपणे उडालेले आहेतच ! जीवनातील अमंगळ व नकारात्मकतेचे मानगुटीवर बसलेले हे भूत या कथावाचनाने निश्चितच उतरेल. 'उद्ध्वस्त-भकास-बेचिराख' निखाऱ्यांतील धगधगता अंगार आता 'क्रांतिमशाल' पेटविल्याशिवाय राहणार नाही... 'उद्ध्वस्त' मधील सर्व कथारूपी वास्तव आता 'फिनिक्स' पक्ष्याप्रमाणे भरारी घेणार आहे... लेखकाच्या लेखणीचे हे सामर्थ्य अन्याय-अनीति-अत्याचाराला वाचा फोडणारे आहे...! म्हणूनच 'उद्ध्वस्त'चा हा धगधगता 'नकाररूपी अंगार' आता बदलत्या काळानुसार कात टाकत आहे... उत्क्रांतीची ही झेप सातासमुद्रापार निश्चितच जाणार... कारण सत्याचरणाचे अधिष्ठान लेखकाच्या प्रयत्नांना लाभले आहे... आणि उज्ज्वल उद्यासाठी हेही नसे थोडके

लेखक. लक्ष्मण माने 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details