Akshardhara Book Gallery
Ujedachya Paulkhuna (उजेडाच्या पाऊलखुणा)
Ujedachya Paulkhuna (उजेडाच्या पाऊलखुणा)
Couldn't load pickup availability
Author: Chanchal Kale
Share
Publisher: Adhyay Publishing House
Pages: 138
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
उजेडाच्या पाऊलखुणा
‘उजेडाच्या पाऊलखुणा' हा चंचल काळे यांचा ललितलेखांचा संग्रह म्हणजे एकूण काव्यात्मवृत्तीच्या या लेखिकेच्या आत्मविष्काराच्या तरल संवेदना काही लेखातून जागा करणारा हा लेखनसंवाद आहे. ललितगद्यातील आत्मपर लेखन या प्रकारात बरेचसे लेखक लिहिताना दिसतात, पण हे आत्मपर लेखन करताना काही वेळा लेखक त्यात इतका गुंतून जातो आणि ते लेखन आत्मनिष्ठ होऊन जाते. लेख दीर्घ झाले की वाचक कंटाळून जातो, त्याची उत्कंठा संपते, पण चंचल काळे यांचे आत्मपर लेख किंवा एकूणच लेख आटोपशीर आहेत. चंचल काळे यांनी या सर्व लेखनातून आत्मभावपर, आठवणीस्वरूप, प्रसंगचित्रण, व्यक्तिचित्रण, प्रवास, स्मरणरंजन, निसर्गचित्रण, चिंतन, आत्मचिंतन असे बहुपेडी चित्रण केलेले दिसते.
निसर्ग आणि माणूस यांचे नाते लेखिका शोधते. सहज सुंदर शैलीत सहजपणे चिंतन आणि लालित्य यांची गुंफण करते. कवितेप्रमाणेच ललित- लेखनाला भाववृत्तीत डूब घेण्याची आवश्यकता असते. सर्जनशील लेखनाचे ते गमक आहे. ‘उजेडाच्या पाऊलखुणा' या संग्रहामध्ये बऱ्याच अंशी लेखिकेने ते साध्य केले आहे.
लेखक : चंचल काळे
