Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Us Pikasathi Thibak Sinchan (ऊस पिकासाठी ठिबक सिंचन)

Us Pikasathi Thibak Sinchan (ऊस पिकासाठी ठिबक सिंचन)

Regular price Rs.250.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.250.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vijay Mali

Publisher: Mihana Publications

Pages: 111

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

ऊस पिकासाठी ठिबक सिंचन

एक यशस्वी तंत्रज्ञान

या पुस्तकामध्ये ऊस पिकासाठी बेसुमार मोकाट पाणी वापर केल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो हेक्टर ऊसजमिनी ह्या खारवट, खारवट-चोपण व चोपण झालेल्या आहेत, त्यामुळे ऊस पिकाचे उत्पादन वाढीसाठी मर्यादा येत आहेत. पाण्याच्या अतिवापरामुळे जमिनीत जाणारे क्षारांचे प्रमाण व ते गेलेले क्षार धुवून जाण्यासाठी वार्षिक किती पाऊसमान होण्याची आवश्यकता आहे, ही माहिती संदर्भासहित देण्यात आली आहे. ठिबकसिंचनाने ऊसपीक घेतल्यास जमिनी कशाप्रकारे सुधारून जमिनींची उत्पादन क्षमता वाढते याचा ऊहापोह केला आहे. जमिनीमध्ये कायमस्वरूपी वाफसा निर्माण करण्यासाठी ऊसपिकाच्या वाढी व गरजेनुसार शास्त्रीयदृष्ट्या व ठिबकद्वारे किती पाणी द्यायला पाहिजे याची सखोल माहिती दिली आहे. ठिबकचे आयुष्य वाढविण्यासाठी ठिबकची निगा व काळजी, आम्लप्रक्रिया; क्लोरीन प्रक्रिया व दुरुस्ती इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले आहे. 

ऊसाचे एकरी ८० ते १५० मे. टन ऊस उत्पादन घेण्यासाठी पिकाच्या वाढीनुसार आवश्यक अन्नद्रव्यांची मात्रा ठिबकद्वारे कशी व केव्हा द्यावी याचे वेळापत्रक देण्यात आले आहे. त्यानुसार रासायनिक खतांचा वापर केल्यास निश्चितच ऊस उत्पादन साध्य करता येईल. 

ऊसाचे दर्जेदार बेणे, जमिनीनुसार दोन सरीतील अंतर ठिबकसिंचनाचा प्रकार, आंतरमशागत कशा पद्धतीने करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. ऊसाच्या पानांची लांबी-रुंदी, फुटवा व पांढरी मुळीची वाढ करण्यासाठी विविध संप्रेरकांचा वापर कधी व कसा करावा याचे वेळापत्रक दिलेले आहे.
ऊसाच्या उत्पादनात १२ ते १५ टक्के ऊस उत्पादन वाढीसाठी दक्षिण-उत्तर ऊसाची लागवड करावी याचा संदर्भासहित समावेश केलेला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील अधिक उत्पादन घेतलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनुभव सुद्धा नमूद करण्यात आलेले आहेत. तरी हे पुस्तक वाचून बारकावे समजून ऊस शेती केल्यास निश्चितच एकरी १०० ते १५० मे. टनापर्यंत उत्पादनाचे उद्दिष्ट गाठता येईल यात तिळमात्र शंका नाही.

लेखक : विजय माळी

View full details