Akshardhara Book Gallery
Ushakal (उषःकाल)
Ushakal (उषःकाल)
Couldn't load pickup availability
Author: Vikram Bhagwat
Share
Publisher: Mihana Publications
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
उषःकाल'
कादंबरीच्या सुरुवातीला नायिका 'किट्टा' तिच्या सहकाऱ्यांना उद्देशून म्हणते, "मीच एका जागी कशी रमले? की, हे सर्व मी केले आहे याचा अहंभाव माझ्या मनात निर्माण झाला आहे आणि त्यामुळेच हे सर्व सोडवत नाहीये? हे सर्व सोडून आपण काय करणार आहोत? पुन्हा एकदा अस्थिरतेकडे प्रवास करायचा आहे का? आपल्याला मनात पडलेल्या प्रश्नांना भिडावे लागणार आहे याची मला तीव्र जाणीव झाली. या घरट्याच्या सुरक्षित जगाबाहेर एक असुरक्षित जग अजूनही आहे. ते कायम असणार आहे. मला ते जग खुणावते आहे. मी काही जास्त शिकलेली नाही, पण तरीही मी त्या जगात जगू शकते. ते जग समजावून घेऊ शकते. केवळ शिकलेले, बौद्धिक जग हे फक्त दहा टक्के आहे, उरलेल्या नव्वद टक्के जगाला कोणीतरी मदत करायला नको का ? मदत म्हणजे त्यांना अपंग नाही करायचे तर, इथे जे आपण करतोय तेच, त्यांच्या जगात जगून, राहून, आपल्याला करता येणार नाही का? असे विचार जेव्हा माझ्या मनात येऊ लागले तेव्हा जाणवले की, आपण त्या जगाच्या तुलनेने उच्चभ्रू झालो आहोत. सुरक्षित झालो आहोत. काही दिवसांनी असुरक्षितता म्हणजे काय? हे आपण विसरून जाऊ आणि म्हणूनच मी 'घरट्या'तून एक पाय बाहेर काढण्याचे ठरवले आहे." इथेच किट्टाच्या आयुष्यातील नवे पर्व सुरू होते. 'उषःकाल' हा एका अर्थाने किट्टाच्या आयुष्याचा उतारार्ध! तो वाचकांना नक्कीच भावेल याची खात्री आहे.
लेखक. विक्रम भागवत
प्रकाशक. मिहाना पब्लिकेशन .
