Vandana (वंदना)
Vandana (वंदना)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दैनंदिन जीवनात येणार जाती व्यवस्थेचा अनुभव आणि त्यातून निर्माण झालेल्या विषम परिस्थितीवर मात करणार्या वंदनाचा संघर्ष वाचकांना खिळवून ठेवणारा आहे. एक स्त्री, त्यातही दलित स्त्री, कुटुंब प्रमुख स्त्री, तिचा संघर्ष वाचनीय आहे. शहाजीराव बळवंत यांनी शिक्षणाचा अभाव आणि पारंपरिक आर्थिक व सामाजिक दारिद्र्य असणार्या मागास वस्तीतील लोकांच्या जीवनाचे चित्रण अगदी हुबेहूब केले आहे.
बौध्द कुटुंबात जन्मलेली वंदना, तिच्या वस्तीगृहातील मैत्रिणींमधील आपसातील संवादातून कादंबरीची सुरुवात होते. पुढे अस्सल माणदेशी भाषा वाचकांना वाचावयास मिळते. पात्रांची ग्रामीण जगण्याची नाळ जोडते. दारिद्र्य अनुभवलेली वंदना, ग्रामीण भागात जन्मलेली वंदना ते आय. ए.एस. अशी उच्च शिक्षित झालेली वंदना, अशी पार्श्वभूमी असलेली ही कादंबरी असली तरी या कादंबरीला अनेक पदर आहेत.
ISBN No. | :UTK0198 |
Author | :Shahajirao Balvant |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :320 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |