Ghat Rikama (घट रिकामा )
Ghat Rikama (घट रिकामा )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दु:खद वैवाहिक जीवन विसरण्यासाठी व्यापक आशावाद गरजेचा आहे. आणि त्याचबरोबर माणसाने 'पूर्वग्रहदोषमुक्त दृष्टीकोन' सुद्धा बाळगला पाहिजे, असं काहीस बर्ट्रांड रसेल म्हणतो. या त्यांच्या म्हणण्याचा लेखक श्री. भ. पु कालवे यांनी कादंबरीच्या सुरुवातीलाच आधार घेतला आहे. व्यापक आशावाद कोठून येतो आणि कसा मिळविता येतो,याबाबत आपल्या परंपरेत काहीएक चर्चा झाली आहे.
उदा. भवसागर तरूण जाण सामान्य जीवाला अवघड. त्यातून जाण्यासाठी मग ‘घट’ सोबत असावा लागतो, अशी संकल्पना मांडलेली आहे. पण हा घट रिक्तही नसावा. तो सदविचाराने आणि सत्कृत्याने भरावा लागतो.विश्वास आणि प्रेमाने भरावा लागतो. अहंकारशून्यतेनेही भरावा लागतो. तो रिकामा असेल तर भवसागर तरून जाण दुष्प्राप्य, दुर्घट. हा घट भरलेला ठेवण ही प्रत्येक विवाहित जीवाची एका अर्थाने आध्यात्मिक जबाबदारी असते.
ISBN No. | :9789391663018 |
Author | :B P kalave |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :paperback |
Pages | :240 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |