akshardhara
Kathankur ( कथांकुर )
Kathankur ( कथांकुर )
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
व्यंकटेश माडगूळकर यांच्या कथेने सुमारे ५० वर्षांपूर्वी सर्वसामान्य वाचकांचे लक्ष ग्रामीण वास्तवाकडे वेधले, भारत हा असंख्य खेड्यांचा देश आहे, हे जाणवून दिले. गावकडच्या माणसांचे जग, त्यातील मूल्ये, संघर्ष, नातेसंबंध विजिगीषा वृत्ती यासंबंधी ताकदीने व धाडसाने लिहिले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या साहित्यिक वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी प्रतिष्ठान स्थापन केले गेले. प्रतिष्ठानतर्फे नवोदित लेखकांकडून ग्रामीण जीवनावरील कथा मागविण्यात आल्या होत्या. त्या वाचल्यानंतर असे जाणवले की आजची तरूण पिढी ग्रामीण जीवनाकडे प्रगल्भपणे पाहते आहे. या कथा संवेदनशील व भावनाप्रधान आहेत. त्यात भाषेचा अस्सल बाण दिसतो. सामाजिक जाणीव, व्यक्तीच्या वागण्यामागची कारणमीमांसा, एखाद्या घटनेचा गावगाड्याशी असलेला संबंध याचे भान या लेखकांकडे आहे याची साक्ष मिळते; वाचताना वृत्ती खिळवून टाकणारी जीवनदर्शन या कथांमधून होते.
| Author | :Dnyanada Naik |
| Publisher | :Utkarsha Prakashan |
| Binding | :Paperback |
| Pages | :272 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
