Aakashjhep ( आकाशझेप )
Aakashjhep ( आकाशझेप )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
भूषण जोखमीच्या गुप्त कारवाईवर गेले असताना मेघनाच्या मनाची झालेली घालमेल सियाचीन कारवाईच्या वेळी केलेल्या कार्यवाहीच्या प्रकरणात वाचायला मिळते. तसेच एक दोन वेळा जिवावरच्या अपघातामधून सुदैवाने भूषण वाचल्यानंतर दाटून आलेल्या तिच्या भावना तांबरमधील वास्तव्याच्या वर्णनात वाचायला मिळतात. १९७१ च्या युध्दाच्या वेळचे वर्णन वाचून युध्दप्रसंग डोळ्यांसमोर उभा राहतो. अनेकदा नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेले एअर फोर्सचे काम, भूषणने अनेक महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये, विमानामध्ये सुचवलेले बदल किंवा सुधारणा याविषयी वाचताना वायुसेनेविषयी अभिमान वाटतो. फायटर पायलट म्हणून वायुसेनेत भरती होण्यासाठी कशा प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागतात, इथपासून ते अगदी एअर मार्शल पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती परीक्षा, किती टप्पे पार करावे लागतात या पर्यंतचे अतिशय सुंदर मार्गदर्शन या पुस्तकातून तरूण पिढीला होईल.
Author | :Air Marshal Bhushan Gokhale |
Publisher | :Utkarsha Prakashan |
Binding | :Hard Bound |
Pages | :360 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |