Akshardhara Book Gallery
Varjitmadhya (वर्जितमध्य)
Varjitmadhya (वर्जितमध्य)
Share
Couldn't load pickup availability
Author: Surendra Darekar
Publisher: Srujansanvad Prakashan
Pages: 183
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
वर्जितमध्य
'वर्जितमध्य' संग्रहातील कथापंचक हा सुरेंद्र दरेकर यांच्या कथनात्मकतेचा सहावा आविष्कार- खरंतर षटकारच ! वर्जितमध्य ही एक संकल्पना. एखादी घटना घडेल किंवा घडणार नाही याविषयीच्या संभवनियतेचा तार्किक आकार. त्यानुसार या कथेतील पात्रे एका सजगतेने लौकिक व्यवहारांकडे पाहत नित्याचे धकाधकीचे जीवन जगत असतात. अशा जाणिवेतून आपल्या संबंधातील लोक, परिसर व पर्यावरणाला प्रतिसाद देताना स्वेतर संदर्भात जे काही प्रयत्नपूर्वक व आपसया घडत जाते त्यातील सूत्रात्मकता जोखण्याचा प्रयास हे या कथेचे आशयभान म्हणता येईल. असे भान या संग्रहातील सर्वच कथांना मध्यवर्तीत्वाने व्यापून आहे. निव्वळ रंजकतेहून अधिक असे काहीएक तात्त्विक शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या कथेने आरंभापासून सातत्याने केलेला दिसून येतो. 'वर्जितमध्याचा नियम' कथेतील वसू, 'चिंतयामी अतः अस्मि'तील अनुजा, 'प्रत्यावर्त'मधील रश्मी, 'स्वप्नदृष्टांता'तला बाबू व 'उभयान्वया'तील हनुमंत हे अशा चौकस भानाचे प्रतिनिधी ठरावेत. त्यांना पडणारे प्रश्न व त्याच्या सोडवणुकीत होणारा ऊर्जाव्यय हे एकाच वेळी मुक्त इच्छाशक्ती (Free will) व स्वातंत्र्याचा पैस (Freedom) अशा तत्त्वमूल न्यासाला अनुसरणारे आहेत. सहजसुगम भाषा, क्वचित फँटसीचे वळण घेणारा तरी स्वाभाविक घटनाक्रम व निवेदनाची अनघड शैली यातून गुंफलेले हे अनुभव वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते घटितातील वस्तुनिष्ठेला प्रश्नांकित करत काहीसे उत्तरआधुनिक अंगाने जाणारे असल्याने मराठी कथनात्मकतेचा तात्त्विक वैचारिक बाज ठसठशीतपणे साकारतात हे नक्कीच ! ---डॉ. मीनाक्षी पाटील
लेखक. सुरेंद्र दरेकर
प्रकाशक. सृजनसंवाद प्रकाशन
