Akshardhara Book Gallery
Vastavikateche Rang ( वास्तविकतेचे रंग )
Vastavikateche Rang ( वास्तविकतेचे रंग )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dilip Phadke
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 211
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:'---
वास्तविकतेचे रंग
ही कहाणी आहे आजच्या काळाची, भोवतालच्या वर्तमानाची अन् या वर्तमानात वावरणार्या व्यक्तींची, समाजाची, जनसमूहाची आणि जनमानसाची. ही कहाणी आहे एका धैर्यवान मुलीची. प्रतिकूल परिस्थितीत जन्म, पण तिच्यावर मात करणारी जिद्द. शिक्षणाने दिलेली क्षमता अन् सामर्थ्य. त्यातून लाभलेल्या आत्मविश्वासातून ती लढायला शिकली. लढा जातिभेदाशी. लढा लोकांच्या पूर्वग्रहांशी. आपली स्वप्नं वास्तवात आणताना येणार्या अडथळ्यांशी. आपलं भविष्य घडवताना त्याला डागाळणार्या वर्तमानाशी. या लढ्यात तिला यश मिळालं का ? या लढ्यात तिला आपल्या जोडीदाराची किती साथ मिळाली ? की वर्तमानातल्या विटक्या रंगांनी तिच्या स्वप्नांना डागाळून टाकलं ? आजच्या समस्यांची गुंतागुंत उलगडत व्यामिश्र वर्तमानाचा वेध घेणारी कादंबरी.
प्रकाशक : राजहंस प्रकाशन