Akshardhara Book Gallery
Vidrohi Leki ...Yanni Kranti Keli ( विद्रोही लेकी.. यांनी क्रांती केली )
Vidrohi Leki ...Yanni Kranti Keli ( विद्रोही लेकी.. यांनी क्रांती केली )
Share
Couldn't load pickup availability
Author: Achyut Godbole , Dr.Madhuri Kulkarni
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 240
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
विद्रोही लेकी.. यांनी क्रांती केली
स्त्रीवादाच्या विचारांना नवी दिशा देणारं पुस्तक!.
हे पुस्तक म्हणजे विविध काळांमधल्या आणि संस्कृतींमधल्या स्त्रीवादी इतिहासाची एक अनोखी रोमहर्षक यात्राच आहे.ज्या व्यक्तींनी प्रचलित अन्यायकारक सामाजिक व्यवस्थांना झुगारून देण्याचं धाडस केलं आणि ज्यांनी नवीन सामाजिक घडी बसवण्यासाठी अनन्यसाधारण लढे दिले अशा महान व्यक्तींच्या, अंगावर सरसरून काटा आणणाऱ्या संघर्षाच्या कहाण्या या पुस्तकात वाचायला मिळतील. या महान व्यक्तींनी केलेल्या अचाट संघर्षामुळे आणि समर्पणामुळे नंतरच्या पिढ्यांचं आयुष्य सुखकर झालं. पुस्तकाचं प्रत्येक पान, धैर्य आणि टोकाची चिकाटी दर्शवणाऱ्या घटनांनी ओतप्रोत भरलेलं आहे.
अतिप्राचीन काळापासून ते आधुनिक काळातल्या स्त्रीवादाचे स्वरूप आणि संदर्भ कसे बदलत गेले हे पुस्तक वाचताना लक्षात येतं. या पुस्तकात, स्त्रीवादाच्या विविध पैलूंचे पदर अनेक उदाहरणं देऊन उलगडले आहेत. या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन प्रचलित चालीरीतींचा आणि परंपरांचा डोळसपणे विचार करायला लावण्याची क्षमता या गोष्टींमध्ये आहे.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात या स्त्रीवादी लढ्यांची फलश्रुती अनुभवतो, हे पुस्तक वाचताना लक्षात येतं.
या समाजव्यवस्थेत होणाऱ्या बदलांचा आपण केवळ साक्षीदार न होता, या बदलांचा एक भाग झालं पाहिजे अशी प्रेरणा हे पुस्तक वाचताना नक्कीच मिळते.
प्रकाशक : मायमिरर पब्लिशिंग हाऊस

