Akshardhara Book Gallery
Vimuktayan (विमुक्तायन)
Vimuktayan (विमुक्तायन)
Couldn't load pickup availability
Author: Laxman Mane
Share
Publisher: Mehta Publishing House
Pages: 391
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
विमुक्तायन
'विमुक्तायन' हे पुस्तक म्हणजे संवेदनशील मनाने मानवतेला, विश्वाला घातलेली आपलेपणाची साद व अभ्यासपूर्ण वेध. 'माणसाने माणसाशी माणसासम वागावे' हे लेखकाला अभिप्रेत आहेच; तरी या भटक्या जमातांविषयीचा आणखी चिकित्सक व संशोधनात्मक पद्धतीने हा धांडोळा घेतला आहे. त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय जीवन, शैक्षणिक स्तर, एकत्र-विभक्त कुटुंबपद्धती, नवीन ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचावीत, ही भूमिका 'विमुक्तायन' मधून दिसते, अनुसूचित-भटक्या-विमुक्त जाती-उपजातींच्या दैनंदिन गरजांपासून ते त्यांच्या संपूर्ण विकासात्मक योजनांचा आढावा येथे घेतला आहे. कसण्यासाठी त्यांना जमिनी, छोटे-मोठे कुटिरोद्योग; जेणेकरून काही जमातींतील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घातला जाईल, या दृष्टीने केलेले प्रयत्न दिसून येतात. स्वतंत्र भारतातही चोऱ्यामाऱ्या कराव्या लागणे, ही लाजिरवाणी गोष्ट. म्हणून विस्थापितांना एका प्रवाहात आणण्यासाठीचे हे भगीरथ प्रयत्न. ब्रिटिशकालीन सेटलमेंट कायदा, जात पंचायतींचे कडक नियम व कायदे, दुष्ट चालीरीती, चोरी-गुन्हेगारी, दारिद्र्य व अज्ञानाच्या गर्तेत फसलेला हा समाज सुधारावा. या अमानवी दुःख-यातनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या विमुक्तांच्या जीवनास किनारा लाभेल का, हीच लेखकाची तळमळ 'विमुक्तायन' मधून दिसते.
लेखक. लक्ष्मण माने
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
