Akshardhara Book Gallery
Vrukshmatecha Sangharsh (वृक्षमतेचा संघर्ष)
Vrukshmatecha Sangharsh (वृक्षमतेचा संघर्ष)
Share
Couldn't load pickup availability
Author: Anil Daajisaheb Mohite
Publisher: Scion Publication
Pages: 443
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
वृक्षमतेचा संघर्ष
विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा बिनदिक्कतपणे बळी देत देशोदेशीचे धोरणकर्ते स्वतःचे आणि आपल्या मित्र-बगलबच्च्यांचे खिसे भरण्याचे काम कसे अव्याहतपणे करत असतात, हे आपण सारे बघत असतो. केनियाचा तत्कालीन राज्यकर्ता डॅनियल अराप मोई याच्या काळात नेमके हेच होत होते. निसर्गसंपन्न केनियातले सगळे जंगल त्याच्या मित्रांना त्याने जणू आंदणच दिले होते. केनियाच्या ग्रामीण भागात जन्म घेतलेल्या, पुढे अमेरिकेत उच्च शिक्षण घेतले तरी केनियाच्या जमीन, जंगल, पाण्याशी आपली मुळे घट्ट जोडून ठेवणाऱ्या वांगारी माथाई यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरू केला. त्यासाठी सरकारकडून केला गेलेला अनन्वित छळ सोसला. सामाजिक, पर्यावरणीय आणि राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करत असतानाच त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या पर्यावरण रक्षणाच्या कामासाठी त्यांनी तेथे 'ग्रीन बेल्ट मूव्हमेंट'ची स्थापना केली. ही संस्था वृक्षलागवड, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करत होती. अखेर त्या सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या. तिथल्या संसदेत खासदार म्हणून निवडून आल्या. २००४ मध्ये मिळालेल्या नोबेल शांतता पुरस्काराने त्यांच्या कामाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आफ्रिकन महिला ठरल्या. लेखक अनिल मोहिते यांनी या वृक्षमातेच्या सगळ्या आयुष्याचा, संघर्षाचा, त्यातून उभ्या राहिलेल्या सकारात्मक कामाचा वेध या पुस्तकात घेतला आहे. पर्यावरणाविषयी काही कळकळ असणाऱ्या प्रत्येकाकडे हे पुस्तक असले पाहिजे.
प्रकाशक. सायन पब्लिकेशन
लेखक. अनिल दाजीसाहेब मोहिते
