Akshardhara Book Gallery
Vyaajadasha Urf Irony : Sookshma Aani Laghukatha (व्याजदशा उर्फ आयरनी : सूक्ष्म आणि लघुकथा)
Vyaajadasha Urf Irony : Sookshma Aani Laghukatha (व्याजदशा उर्फ आयरनी : सूक्ष्म आणि लघुकथा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Makarand Sathe
Publisher: Shabda Publication
Pages: 200
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
व्याजदशा उर्फ आयरनी : सूक्ष्म आणि लघुकथा
असणे आणि नसणे, सत्य आणि असत्य, वास्तव आणि भ्रम यांचा पाठशिवणीचा खेळ म्हणजे व्याजदशा. जे आहे ते दडवणे आणि नाही ते सजवून पुढे मांडणे ही जगण्याची रीत होते तेव्हा जगण्यातील व्याजदशा अस्तित्वात येते. मकरंद साठे या संग्रहामधून व्याजदशेची अनेकस्तरीय संकल्पना समकालीन भारतीय समाजाच्या व व्यापक अर्थाने मानवी संस्कृतीच्या संपर्कात आणतात आणि या संपर्कातून निर्माण झालेल्या कथनांमधून माणसांनी आपल्या व्यवहारांतून निर्माण केलेला परिपूर्ण विकृत समाज-डिस्टोपिया साकार करतात. हा समाज विनाशाच्या कडेलोटाजवळ जाऊन पोहोचलेला आहे. बदलांचा अफाट वेग, त्याच्याशी जमवून घेण्यात येणारे अपयश, त्यामुळे जगण्याच्या प्रत्येक पैलूतून जाणवणारा तात्पुरतेपणाचा अनुभव यांनी तो ग्रासला आहे. तंत्रज्ञानाचा अतिरेक, एकाकीपणा, भांबावलेली आत्ममग्नता, ज्ञानप्रक्रियेतील फोलपणा, स्पर्धा, हिंसा, झुंडीत असण्याची झिंग अशा विशेषांनी आकार दिलेल्या समाजाचे अत्यंत भेदक असे चित्रण या संग्रहात अपवादात्मक तटस्थतेने केले आहे. अवस्थांतरण सुचवणाऱ्या एखाद्याच किंवा मोजक्या घटनांच्या किमान शब्दांच्या कथनातून सिद्ध होणाऱ्या सत्तावीस सूक्ष्मकथा आणि घटनांच्या सादरीकरणापेक्षा कथकाच्या विश्लेषक भाष्याला अधिक मूल्ययुक्त मानणाऱ्या तेवीस आटोपशीर लघुकथा या संग्रहात समाविष्ट झाल्या आहेत. व्याजदशेचे आशयसूत्र, सर्वत्र उपस्थित असणारा विश्लेषक कथक आणि समाविष्ट संहितांमधली आंतरसंहितात्मकता या विशेषांमुळे ही आतून वीण उसवलेली पण तरीही सलगतेचे अवशेष जपणारी एक कादंबरीच आपण वाचतो आहोत, असा अनुभव वाचकाला येऊ शकतो. तसेच, हा संग्रह अल्पाक्षरयुक्त लघुकथेच्या अर्थसंपृक्ततेचे दुर्मीळ उदाहरण म्हणूनही पाहता येतो. सूक्ष्मकथा आणि लघुकथा या दोहोंविषयीचे येथील भान मराठी साहित्याच्या परंपरेत अभिनव म्हणावे असे आणि लघुकथा या साहित्यप्रकाराला नवे परिमाण प्राप्त करून देणारे आहे.
लेखक. मकरंद साठे
प्रकाशक. शब्द पब्लिकेशन
