Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Vyavharik Marathi (व्यावहारिक मराठी)

Vyavharik Marathi (व्यावहारिक मराठी)

Regular price Rs.540.00
Regular price Rs.600.00 Sale price Rs.540.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: L R Nasirabadkar

Publisher: Bhashavikas Sanshodhan Sanstha

Pages: 478

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

व्यावहारिक मराठी

प्रत्येक मराठी माणसाला व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे पुस्तक अभ्यासता येईल. व्यक्तीच्या विकासात भाषिक कौशल्ये सर्वात महत्त्वाची आहेत. त्यामुळे भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी आवश्यक बाबींची पुरेशी चर्चा येथे करण्यात आली आहे. निरंतर वाचन, त्यासाठी योग्य पुस्तकांची निवड, शब्दसंग्रहाची वृद्धी, नव्या अर्थपूर्ण शब्दांची ओळख आणि निर्मिती, बोलीभाषांच्या परिचयातून येणारी भाषासमृद्धी भाषिक कौशल्ये वाढवण्यास मदत करते. भाषिक कौशल्ये आत्मसात झाली की व्यक्तिमत्त्व संपन्न होते. व्यक्तिमत्त्व संपन्न झाले की आत्मविश्वास वाढतो. जो जीवन समृद्ध करतो. भाषिक आत्मविश्वास हा बदलत्या काळात सर्वात महत्त्वाचा ठरतो आहे. ज्याच्या बळावर व्यक्ती आपले जीवन बदलू शकते. 'व्यावहारिक मराठी' या पुस्तकाची त्यासाठी आवश्यकता आहे. केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम म्हणून या पुस्तकाकडे न पाहता भाषेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी या पुस्तकाचा लाभकरून घेता येईल. या पुस्तकातील भाषिक कौशल्याच्या गोष्टी कोणाही व्यक्तीचे जीवन समृद्ध करण्यास अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या भाषाशिक्षण, भाषेतून तयार होणारे रोजगार आणि व्यवसायाबरोबर भाषा अभिवृद्धीच्याही आहेत. बदलत्या काळातील भाषिक गरजा ओळखून हे पुस्तक नव्याने संपादित करण्यात आले आहे. त्यामुळे व्यावहारिक जीवनात पारंपरिक पद्धतीच्या भाषावापरापासून संगणकाच्या माध्यमातून आणि सामाजिक माध्यमांवर होत असलेल्या मराठीच्या वापरापर्यंतची चर्चा येथे करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विविध ठिकाणी नोकरी करणाऱ्या लिपिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून शिक्षकापर्यंत सर्वांनाच हे पुस्तक भाषिक पातळीवर दिशादर्शन करणारे आहे. हे पुस्तक शालेय स्तरापासून पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी लिहिलेले आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रमापासून पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, सर्व स्पर्धा आणि पात्रता परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे ठरले आहे.

लेखक. ल. रा. नसिराबादकर 
प्रकाशक. भाषाविकास संशोधन संस्था 

View full details