Akshardhara Book Gallery
Woohancha Wafara (वुहानचा वाफारा)
Woohancha Wafara (वुहानचा वाफारा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Vijay Tambe
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
वुहानचा वाफारा
विजय तांबे यांचा 'वुहानचा वाफारा' हा कथासंग्रह महत्त्वाचा आहे कारण वास्तववादी लिखाण प्रचंड प्रमाणात प्रसवले जात असलेल्या ह्या काळात कल्पिताच्या आधारे कथा आणि कादंबरी लिहिण्याचे जे तुरळक प्रयत्न अजूनही सुरू आहेत, त्याचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. स्वतःची म्हणून एक शैली विकसित झाली की बहुसंख्य लेखक त्या शैलीला शरण जातात. या पार्श्वभूमीवर एकाच संग्रहात मानसशास्त्रीय कथा, विज्ञानकथा आणि राजकीय डिस्टोपियन कथा या तीन वेगवेगळ्या कथाप्रकारांचा वापर ही एक सुखद गोष्ट आहे. या मागील कारण असे आहे की सामाजिक चळवळीमध्ये वाढल्यामुळे लेखकाचा पिंड हा प्रबोधनाचा आहे. आपल्या आसपास जे घडते आहे, त्याचे प्रतिबिंब आपल्या साहित्यात उमटणे लेखकाला महत्त्वाचे वाटते. 'वुहानचा वाफारा' या शीर्षककथेत लेखकाने कल्पिताचा आणि विज्ञानविषयक संशोधन व अभ्यासाचा उत्तम मेळ घातल्यामुळे ती एक वेगळ्याच ढंगाची विज्ञानकथा झाली आहे. कोराना काळाची पार्श्वभूमी वापरली असली तरी ही कथा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या वापराने बदलून गेलेल्या व अजूनही बदलत असलेल्या मूल्यव्यवस्थेविषयी काही मूलभूत चर्चा उपस्थित करते. एकाचवेळी भीतीही दाखवते आणि सोबतच आशेचा किरणही. विज्ञानविषयक तपशिलांनी निवेदन शैली व भाषा दुर्बोध न होऊ देणे ही गोष्ट लेखकाने साध्य केली आहे. सुलभीकरण आणि दुय्यम दर्जाचा वास्तववाद, वर्णनशरण निवेदनशैली आणि अवकाश भरण्यासाठी कथनात 'Packing Material' यांच्या वापराची मराठी कथनात्म साहित्याला सध्या जी खोड लागलेली दिसते, तिला हा कथासंग्रह छेद देतो व म्हणूनच तो आवर्जून वाचावा असा आहे.
लेखक. विजय तांबे
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
