Akshardhara Book Gallery
Yannis Ritsos Yanchya Kahi Kavita (यानिस रित्सोस यांच्या काही कविता)
Yannis Ritsos Yanchya Kahi Kavita (यानिस रित्सोस यांच्या काही कविता)
Couldn't load pickup availability
Author: Yannis Ritsos
Share
Publisher: Varnamudra Publishers
Pages: 71
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:Manoj Surendra Pathak
यानिस रित्सोस यांच्या काही कविता
का वाचायच्या यानिस रित्सोसच्या कविता? का म्हणून वाचायचे यानिस रित्सोस या ग्रीक कवीच्या कवितांचे मराठी रूपांतर? ते विसाव्या शतकातील प्रतिरोधाची, निषेधाची कविता लिहिणारे महत्त्वाचे कवी होते म्हणून ? ते कवी असूनही आजन्म कम्युनिस्ट पक्षाचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी आयुष्यभर सत्तेच्या विरोधातल्या संघर्षात सक्रिय सहभाग घेतला म्हणून? त्यांनी त्यांच्या बहुतेक कविता या तुरुंगवासात असताना, दमनकारी सत्तेने देशाबाहेर हद्दपार केलेले असताना लिहिल्या म्हणून ? की त्यांच्या कविता वाचायच्या कारण त्या सर्वार्थाने सच्च्या कविता आहेत म्हणून? रित्सोस यांच्या त्या कवितांतला प्रतिरोध, निषेध हा त्या कवीच्या आणि कवितेच्याही व्यक्तित्वाचा भाग आहे. या कवितेचा आत्मा हा मूलतः एका कवीच्या हृदयातील करुणा आहे. हा कवितेचा आत्मा रूपबंधाचा देह धारण करत असताना आपल्या अंगभूत प्रतिभेमुळे प्रतिमा, प्रतीकं, उपमा आदी काव्यालंकारांचा वापर करत, कवितेची आंतरिक लय किंचितही बिघडू न देता, उपलब्ध भाषेचा वापर करते. ती पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात ऐकली/वाचली गेल्यास रसिकाच्या हृदयापर्यंत थेट पोचण्याची क्षमता असलेली कविता आहे म्हणून या कवीचा आणि त्याच्या कवितेचा मराठी रसिकाशी परिचय व्हायला हवा. तुरुंगवासात, देशाबाहेर हद्दपार केलेले असताना अत्यंत हालअपेष्टांत दिवस काढत असतानाही हा कवी लिहित होता, एका अविचल निष्ठेने लिहित होता. त्याची जवळजवळ शंभर पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. कदाचित त्याची त्याच्या विचारधारेइतकीच शब्दांवर, लिहिण्यावर श्रद्धा होती. त्याने तुरुंगवासात लिहिलेल्या कविता वाचत असताना सहृदय रसिकाला अनेकदा आपले डोळे ओले झाले आहेत, हे कळतसुद्धा नाही. ही यानिस रित्सोस यांच्या कवितांची ताकद आहे. म्हणून या कविता वाचायला पाहिजेत. त्यांची मराठी रसिकांना ओळख व्हायला पाहिजे. या कविता मुळात ग्रीक भाषेत लिहिल्या गेलेल्या कविता आहेत ज्या पुढे इंग्रजीत, भाषांतरित झाल्या व पुढे हिंदीत आणि आता मराठीत रूपांतरित होऊन रसिकांपर्यंत पोचताहेत. या प्रक्रियेत मूळ कवितेतील आशयाचा, काव्यगुणांचा किती ऱ्हास झाला असेल, हे सांगणे कठीण आहे पण हे रूपांतर करणारे मनोज सुरेंद्र पाठक हे इतर भाषेतील कवींच्या कवितांचे रूपांतर करताना संहितेत स्वतःच्या हृदयीचे काहीतरी 'ओले' नेहमीच मिसळत असतात. त्यामुळे त्यांच्या रूपांतरांत नेहमीच एक करुणेचा, माणुसकीचा, भावनेचा आत्मीय ओलावा असतो. तो रसिकांना यातूनही निश्चितच जाणवेल
मूळ लेखक. यानिस रित्सोस
अनुवादित लेखक. मनोज सुरेंद्र पाठक
प्रकाशक. वर्णमुद्रा पब्लिशर्स
