Akshardhara Book Gallery
YASHWANTRAO CHAVHAN (यशवंतराव चव्हाण)
YASHWANTRAO CHAVHAN (यशवंतराव चव्हाण)
Couldn't load pickup availability
Author: NAGESH SHEVALKAR
Share
Publisher: DURVA AGENCIES
Pages: 112
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:----
यशवंतराव चव्हाण
सामाजिक मनाला जागे करण्याचा प्रयत्न साहित्यानें केला पाहिजे. त्यामागील ज्या सांस्कृतिक प्रेरणा आहेत त्यांना जागे करण्याचे काम साहित्यानें केलें पाहिजे. साहित्याची खरी सेवा या क्षेत्रांत झाली पाहिजे. साहित्याची गोडी आपण एकांतांत चाखतो. पण समाजांत प्रत्यक्ष लोकांमध्यें बसून नाटक पाहणें, लोकनाट्याची मौज लुटणें, कुस्त्यांची रणधुमाळी अवलोकर्णे किंवा क्रिकेटची टेस्ट मॅच पाहण्यांत दंग होणें यांतील मौज कांहीं औरच आहे. एखाद्या जुन्या नाटकांतील पडदा वर जाऊन पेटीचे सुमधुर स्वर वातावरणांत घुमू लागले किंवा सारंगीचे मृदु सूर कानीं पडले की, एका निराळ्याच जगांत आपण प्रवेश करतों. त्यावेळीं आपल्या भावना कशा दोलायमान होतात त्याचें वर्णन शब्दांनीं करतां येणार नाहीं. बालगंधर्वांची ती जुनीं गार्णी आठवली किंवा त्या काळातील नटश्रेष्ठांच्या अभिनय कौशल्याची नुसती आठवण आली की गोड स्मृती चाळविल्या जातात. केशवराव दाते यांच्यासारख्या कसलेल्या नटांच्या भूमिका आणि जुन्या काळांतील ती भरदार नाटके, यांच्या आठवणी देखील किती सुखद वाटतात. रसिक समुदायामध्ये बसून नाटकांची गोडी चाखणे किंवा तमाशांच्या फडांची मौज लुटणे अशा जीवनांतल्या किती तरी गोष्टी आहेत की, ज्यांपासून मी अक्षरशः मनसोक्त आनंद लुटला आहे. बडे गुलामअल्लीखां, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर ह्यांच्यासारख्या सुप्रसिद्ध कलाकारांचें गायन म्हणजे जीवनांतील आनंदाचा उच्चांक होय. साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला ह्यासारख्या कलांनीं माणसाच्या जीवनाला समृद्धी आणलेली आहे. मानवाला सुसंस्कृत वनविलें आहे. परंतु एखादा माणूस साक्षर असून देखील सुसंस्कृत नसतो. कारण जीवनांतील आनंद कसा लुटावा हें त्याला ठाऊक नसतें. कलेचें रहस्य जाणण्याची दृष्टि त्याला प्राप्त झालेली नसते. त्यामुळे जीवनांत त्याचें मन कोठेच रमत नाहीं. त्याला कशापासून देखील विरंगुळा मिळत नाही. अशा प्रवृत्तींपासून आपण दूर राहिले पाहिजे.
लेखक :नागेश शेवाळकर
प्रकाशन : दुर्वा एजन्सीज्
