Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Yogabhyas (योगाभ्यास)

Yogabhyas (योगाभ्यास)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Minal Nene

Publisher: BookGanga Publications

Pages: 114

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

योगाभ्यास

योगशास्त्र म्हणजे नक्की काय ते प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते. आपले रोजचे आयुष्य अधिक सजगतेने आणि सहजतेने जगण्यासाठीचा 'योग' हा एक मार्ग आहे. अर्थातच त्यासाठी संपूर्ण निरोगी असण्याची गरज आहे. हळूहळू आणि सतत सराव करत राहिल्यास शारीरिक आरोग्य सुधारतेच. पण फक्त शारीरिक कसरत म्हणजे योग नव्हे. या पुस्तकाचे लक्षपूर्वक वाचन करून, त्यावर विचार करून, कृती केल्यास 'योग' या विषयाचा आवाका तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्हाला कळेल की वेळ मिळाला की किंवा कधीतरी वेळ काढून शिकण्याचा हा विषय नसून रोजचं आयुष्य अधिक अर्थपूर्ण जगण्याचा, रोजच्या दिनचर्येमध्ये क्षणोक्षणी कृतीत आणण्याचा हा विषय आहे. अर्थातच यामधे मानसिक, भावनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. ते कसे करावे याचे उत्तम मार्गदर्शन तुम्हाला या पुस्तकातून नक्की मिळेल. आपल्या सर्वांना शारीरिक आरोग्य, मानसिक स्थैर्य, शांतता आणि समाधान लाभो याच सदिच्छा. संग्राह्य पुस्तक म्हणून या पुस्तकाचा आपल्याला निश्चितच उपयोग होईल.

लेखक. सौ. मीनल नेने 
प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स  

View full details