Akshardhara Book Gallery
Yugdrashta Bhagatsingh Aani Tyanche Mrutunjayi Purwaj (युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज)
Yugdrashta Bhagatsingh Aani Tyanche Mrutunjayi Purwaj (युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज)
Share
Couldn't load pickup availability
Author: Virendra Sindhu
Publisher: Krishna Publications
Pages: 406
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:Indrayani Chavan
युगद्रष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज
'पिस्तूल आणि बॉम्ब हे कधीच स्वातंत्र्य मिळवून देत नाहीत. स्वातंत्र्याच्या तलवारीला धार येते, ती विचारांच्या सहाणीवर घासूनच.'- सरदार भगतसिंह
अमर हुतात्मा प्रसिद्ध क्रांतिकारक सरदार भगतसिंह यांचं हे प्रामाणिक जीवनचरित्र अनेक वर्षांच्या अध्ययनातून आणि संशोधनातून आकाराला आलं आहे. भगतसिंहांच्या कुटुंबातल्या सर्व ज्येष्ठ सदस्यांकडून मिळालेली महत्त्वपूर्ण माहिती पहिल्यांदाच इथे शब्दबद्ध झाली आहे. या ग्रंथात सरदार भगतसिंह आणि त्यांच्या पूर्वजांची जीवनचरित्रं तर आहेतच; पण त्याबरोबर देशाला स्वतंत्र करण्यासाठी युवा क्रांतिकारकांनी इंग्रजांशी दिलेल्या कठोर संघर्षाचं रोमांचक वर्णनही आहे.
सरदार भगतसिंहांचे धाकटे बंधू सरदार कुलतारसिंह यांची सुकन्या वीरेंद्र सिंधू या चरित्राच्या लेखिका आहेत. त्यांचा जन्म झाला, तेव्हा त्यांचे वडील तुरुंगामध्ये होते. वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत वीरेंद्रजींना आपल्या वडिलांना भेटायला तुरुंगातच जावं लागत होतं. सरदार भगतसिंह यांच्या बलिदानानंतर नऊ वर्षांनी जन्मलेल्या वीरेंद्र सिंधूंना देशप्रेमाचा, क्रांतीचा आणि बलिदानाचा परंपरागत वारसा लाभला आहे. वीरेंद्र सिंधू यांनी भगतसिंहांच्या जीवनावर लिहिलेलं दुसरं पुस्तक आहे- 'भगतसिंह : पत्र आणि दस्तऐवज'
एक प्रामाणिक, ऐतिहासिक दस्तऐवज
मूळ लेखक. वीरेंद्र सिंधू
अनुवादित लेखक. इंद्रायणी चव्हाण
प्रकाशक. कृष्णा पब्लिकेशन
