Akshardhara Book Gallery
Yun Hasee Wadiyaan (यूँ हसी वादियाँ)
Yun Hasee Wadiyaan (यूँ हसी वादियाँ)
Share
Couldn't load pickup availability
Author: Pavani Jagtap
Publisher: Swayam Prakashan
Pages: 95
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
यूँ हसी वादियाँ
खरा निसर्ग
आणि अव्याहत जीवन
प्रत्यक्ष पाहून अनुभवण्यासाठी
तुम्हाला 'निर्भय' व्हावे लागेल ...!
प्रत्यक्ष अनुभवच तुम्हांला
स्वतःच्या आत घेऊन जाईल...
खरा निसर्ग,
त्या-त्या मातीतील माणसं
आणि त्यांच्याबरोबर आलेले अनुभव
यांना सामोरे जातच तुम्ही स्वतःला शोधता...
प्रत्येक क्षण
त्याच क्षणात जगण्याच्या ऊर्मीने
'उकियोगर्ल'ने,
पोरसवदा वयात
काश्मीरमध्ये प्रत्यक्ष अनुभवलेल्या
आणि
नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर असताना लिहिलेल्या,
गुगलवर न सापडणाऱ्या 'काश्मीर स्पर्शाची' गोष्ट या पुस्तकात...
पालक, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी आणि अनुभूती घेण्यास उत्सुक प्रत्येकासाठी...
लेखक : उकियोगर्ल पावनी जगताप
प्रकाशन : स्वयं प्रकाशन

प्रिय उकियो गर्ल पावनी सर्वप्रथम तुझे अभिनंदन. तू खूपच सुंदर असं पुस्तक लिहिलेलं आहे प्रतिक्रिया उशिराच देते कारण पुस्तक मी पुरवून पुरवून वाचत होते पुढे काय पुढे काय ही पण उत्सुकता होती पण पुस्तक संपू नये असं पण वाटत होतं. वाचताना वाटतच नव्हतं की तू पहिल्यांदा हे पुस्तक लिहिले आहे. वाचताना तुझ्या डोळ्यातून कश्मीर माझ्यापुढे उभा राहत होता मात्र तुझं निरीक्षण जबरदस्त आहे. तुझं पुस्तक वाचल्यानंतरच उकियोचा अर्थ मला कळला आणि पुस्तकाचं नाव तर एक नंबर अगदी समर्पक, कधी काश्मीर बघायला गेले तर आता भीती वाटणार नाही मन मोकळेपणाने आम्ही कश्मीर बघू . खूप खूप धन्यवाद. परत एकदा तुझेअभिनंदन आणि पुढच्या लिखाणासाठी तुला शुभेच्छा आम्ही वाट बघतोय तुझ्या पुढच्या पुस्तकाची .सरांचे पण धन्यवाद. त्यांनी एवढे सुंदर पुस्तक आम्हाला पाठवले. थँक्यू
प्रिय पावनी दिनेश जगताप,
तुमचे "यू हसी वादिया (Yu Hasi Vadiya)" हे पुस्तक वाचून मन खरंच भारावून गेले. अतिशय साध्या, ओघवत्या आणि मनाच्या तळापासून आलेल्या शब्दांत तुम्ही हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तक वाचताना कुठेही कृत्रिमता जाणवत नाही; उलट एखाद्या जिवलग व्यक्तीशी मनमोकळा संवाद सुरू आहे, अशी भावना सतत मनात निर्माण होत राहिली.
"यू हसी वादिया" मधून तुम्ही काश्मीर आणि तेथील लोकांचे विविध पैलू अत्यंत संवेदनशीलतेने आणि प्रामाणिकपणे उलगडले आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन, त्यांचे भावविश्व आणि त्यामागील माणुसकी ज्या सहजतेने तुम्ही शब्दांत मांडली आहे, ती खरोखरच विलक्षण आहे. इतक्या लहान वयात इतके परिपक्व, हृदयस्पर्शी आणि विचार करायला लावणारे लेखन पाहून आश्चर्य वाटले.
बऱ्याच दिवसांनंतर असे एखादे पुस्तक वाचायला मिळाले की, ज्यामुळे वाचताना मोबाईल फोनकडे पाहण्याचाही मोह झाला नाही. प्रत्येक पान पुढे काय असेल याची उत्सुकता वाढवत गेले आणि पुस्तक पूर्ण होईपर्यंत मी त्यातच हरवून गेले. हेच एका उत्कृष्ट पुस्तकाचे सर्वात मोठे यश आहे.
तुमच्या या अप्रतिम लेखनासाठी मनःपूर्वक धन्यवाद. अशीच निरीक्षणशील राहा, जगाकडे विविध दृष्टिकोनातून पाहत राहा आणि तुमचे अनुभव मनापासून शब्दबद्ध करत राहा. तुमच्यातील ही संवेदनशील लेखिका भविष्यात नक्कीच मोठी भरारी घेईल, असा विश्वास वाटतो.
तुमच्या आई-वडिलांचेही मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. त्यांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि संवेदनशीलतेची शिदोरी तुमच्या प्रत्येक शब्दातून जाणवते. अशा गुणी, अभ्यासू आणि मनस्वी लेखिकेला घडवल्याबद्दल त्यांचे मनापासून कौतुक.
प्रिय पावनी, तुमच्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! अशीच उत्तम पुस्तके लिहित राहा, असंख्य वाचकांच्या मनात घर करा आणि साहित्यविश्वात तुमची वेगळी ओळख अधिकाधिक उजळत राहो.
खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद!
मी नुकतेच "यूँ हसी… वादियाँ" हे पुस्तक वाचले.
हे पुस्तक वाचताना जणू आपण स्वतः हे सर्व अनुभव घेत आहोत असे वाटते.
हे अतिशय सुंदर पुस्तक आहे.
मी नुकतेच हे पुस्तक वाचून पूर्ण केले. काश्मीरविषयी असलेल्या अनेक समज-गैरसमजांना नव्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. पवनी ने केवळ ऐतिहासिक किंवा राजकीय माहिती देण्याऐवजी स्वतःचे अनुभव, निरीक्षणे आणि काश्मीरमधील सामान्य लोकांचे जीवन यांचे वास्तववादी चित्रण केले आहे.
तिच्या मते, काश्मीरकडे आपण अनेकदा माध्यमे किंवा इतरांच्या मतांच्या आधारे पाहतो. त्यामुळे आपल्या मनात भीती, संशय आणि चुकीच्या समजुती निर्माण होतात. परंतु प्रत्यक्षात तेथील सामान्य नागरिक शांतताप्रिय, आदरातिथ्यशील आणि कठीण परिस्थितीतही धैर्याने जीवन जगणारे आहेत. या विचारांची मांडणी पवनी ने अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील पद्धतीने केली आहे.
या पुस्तकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते वाचकाला विचार करायला भाग पाडते. प्रत्येक गोष्टीकडे स्वतः अनुभव घेऊन मत तयार करण्याचा संदेश पवनी देते. पुस्तकातील भाषा साधी, ओघवती आणि वाचकाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहे.
माझ्या मते, हे पुस्तक केवळ काश्मीरविषयी माहिती देणारे नसून मानवी मूल्ये, सत्य जाणून घेण्याची वृत्ती आणि व्यापक दृष्टिकोन विकसित करणारे आहे. प्रत्येक भारतीयाने हे पुस्तक एकदा तरी वाचावे, कारण ते आपल्याला केवळ काश्मीरच नव्हे तर कोणत्याही विषयाकडे खुले मन ठेवून पाहण्याची प्रेरणा देते.
माझे मत:
हे पुस्तक वाचल्यानंतर काश्मीरकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि सकारात्मक झाला. लेखकाने मांडलेले विचार विचारप्रवर्तक आहेत आणि वाचकाला वास्तव समजून घेण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे मी या पुस्तकाला ५ पैकी ५ गुण देईन आणि हे पुस्तक वाचण्याची नक्की शिफारस करेन.
अमोल सावंत
जनसंपर्क अधिकारी
शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल सासवड
हे पुस्तक वाचताना काश्मीरचे नैसर्गिक सौंदर्य, तेथील संस्कृती आणि इतिहास जिवंतपणे अनुभवायला मिळाला. लेखिकेने केलेले वर्णन अत्यंत प्रभावी आणि मनाला भिडणारे आहे. पुस्तकामुळे काश्मीरबद्दलची उत्सुकता आणि आदर अधिक वाढला.