akshardhara
Vadiladhari Manase (वडीलधारी माणसे)
Vadiladhari Manase (वडीलधारी माणसे)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘वडीलधारी माणसे’ या पुस्तकात शान्ताबाईंनी काही जिव्हाळ्याच्या माणसांची अक्षर-चित्रे हृद्य शैलीत रेखाटलेली आहेत. वाङ्मयीन आणि वैचारिक क्षेत्रात एखाद्या डोंगरासारखे उभे असलेले विचारवंत आणि प्रेमळ गुरू श्री. म. माटे, निरामय प्रसन्नता आणि मनाची स्थिर समधात वृत्ती यांचा आदर्श उभा करणारे रा. श्री. जोग, कार्याच्या प्रचंड पसार्यातही आपल्या मनातला हळवा, संवेदनशील कवी जागा ठेवणारे आचार्य अत्रे, उपेक्षा पचवीत अन् गौरव अनुभवीत अभिजात संयमाने आयुष्य जगणारे मामा वरेरकर, तात्कालिकापेक्षा कालातीताशी नाते जडवून राहिलेल्या मनस्विनी दुर्गाबाई भागवत यांसारख्या ‘गुरुजनां’प्रमाणेच शान्ताबाईंनी, संगीतात रंगलेल्या अन् माणसांत रमलेल्या मंगेशकर भावंडांची भावरूपे आत्मीयतेने अक्षरांकित केली आहेत. आपल्या अंगभूत शहाणपणामुळे घडता घडता शिकत गेलेले प्रकाशक केशवराव कोठावळे यांचे व्यक्तिचित्र वेधक आहे; कलासक्ती अन् आत्मपीडक वृत्ती यांच्या गूढ संबंधाकडे संकेत करणारे वसंत पवारांचे व्यक्तिचित्र तर वाचकांना अस्वस्थ करून सोडणारे आहे. विषेश म्हणजे, ‘मूळच्या निरर्थक मानवी आयुष्याला आपण देऊ तो अर्थ असतो,’ असा सहज सिध्दान्त सांगणारी अन् सार्थ आयुष्य स्त्रीच्या स्वाभाविक सोशीकपणाने जगणारी आपली आईही शान्ताबाईंनी वाचकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनविली आहे. कुणावरही अतिरिक्त गौरवाचा लेप न चढवता साध्या, अनलंकृत शैलीत केलेल्या या प्रसन्न लेखनाला अतिशय हृद्य असा अकृत्रिम जिव्हाला लाभलेला आहे.
ISBN No. | :30923 |
Author | :Shanta Shelke |
Publisher | :Suresh Agency |
Binding | :Paperback |
Pages | :184 |
Language | :Marathi |
Edition | :2013/08 - 6th |