Aaina-E-Gajal (आईना-ए-गजल)
Aaina-E-Gajal (आईना-ए-गजल)
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
गजल ही पर्शियन भाषेकडून उर्दू भाषेला मिळालेली अमुल्य भेट आहे. उर्दू काव्य उर्दू गजलेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. 'गजल' हा अरबी शब्द आहे. मात्र गजलला जी मान्यता पर्शियन, उर्दू, हिंदी, मराठी, पंजाबी, गुजराती, व अन्य भाषांमध्ये मिळाली ती अरबी भाषेत मिळाली नाही. उर्दू भाषेतील गजल जगभर प्रसिद्ध पावली. मराठीतही अनेक कवी गजल पेश करतात. दर्दी रसिक त्याचा आस्वाद घेत असतात. पण सामान्यांना त्यातील शब्दांचे अर्थ समजत नाहीत. गजल ऐकण्याचा आनंद सर्वांना घेता यावा यासाठी डॉ. जरीना सानी व डॉ. विनय वाईकर यांनी आईना-ए-गजल हा शब्दकोश त्यात केला आहे. यात अ अक्षरापासून सुरवात करून क ते ह या बाराखडीतील हाजारो शब्द आहेत. उर्दू शब्दाचा हिंदी, मराठी, इंग्रजीतून अर्थ, तसेच त्या शब्दाचा वापर केलेला शेर, त्याचे शायर किंवा गजलकार यांच्या नावाचा उल्लेखही केला आहे. अशा तऱ्हेने उर्दू गजल, शेरो-शायरीतील नजाकत, सौंदर्य समजण्यास सोपे होते. शब्दकोशात गजलचा इतिहासही दिला आहे. पर्शियन ते उर्दू असा गजल प्रवास कसा झाला हे यातून कळते.
ISBN No. | :34281 |
Author | :Dr Vinay Vaikar |
Publisher | :Continental Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :310 |
Language | :Hindi |
Edition | :6th/2016 - 1st/1983 |