Ashwathama Mahabharatatil Ek Shapit Yoddha ( अश्वत्थामा महाभारतातील एक शापित योध्दा )
Ashwathama Mahabharatatil Ek Shapit Yoddha ( अश्वत्थामा महाभारतातील एक शापित योध्दा )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
महाभारतातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अमर व्यक्तिरेखा असूनही अश्वस्थाम्याच्या वाट्याला सदैव उपेक्षाच आली, ही नियतीने एका महान योदध्याची केलेली फार मोठी विटंबना म्हणावी लागेल. पौराणिक साहित्यामध्ये अश्वस्थाम्याप्रमाणे आणखीही काही जण आहेत, ज्यांना अमर मानले जाते; पण या बाकी सगळ्यांना अमरता हे एक वरदान म्हणून प्राप्त झालेले असताना एकट्या अश्वत्थाम्यालाच फक्त अमरता एक शाप म्हणून वाट्याला आलेला आहे.
युध्दाची कथा ही नेहमीच अमानुष संहार, निरपराधांचे बळी आणि दुष्कृत्यांच्या काळ्या शाईने लिहिली जाते. महाभारतात अश्वत्थाम्याच्या हातून असे कोणते दोन अक्षम्य अपराध घडले, ज्यामुळे कृष्णाने त्याला हजारो वर्षे पृथ्वीवर एकाकी आणि दयनीय अवस्थेत भटकत राहण्याचा अभिशाप दिला? अश्वत्थाम्याच्या मनात आजही हा प्रश्न रेंगाळतो आहे की, एवढा कठोर शाप देऊन कृष्णाने खरच आपल्यावर अन्याय केला की त्यामागे भगवान श्रीकृष्णाची काही दैवी योजना होती? अश्वत्थाम्याच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाला आधुनिक युगातील समाजात काही संदेश तर द्यायचा नाहीये ना?
बहुतेक सगळे लोक अश्वत्थान्याला दुर्योधनाप्रमाणॆच कपटी आणि दुर्वर्तनी समजतात. लेखकाने या पुस्तकात अश्वत्थाम्याच्या जीवनातील काही अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला असून, त्या महान योदध्याच्या दृष्टिकोनातून महाभारताच्या कथेला एका नव्या स्वरूपात मांडले आहे.
ISBN No. | :9789355430090 |
Author | :Ashutosh Garg |
Publisher | :Manjul Publishing House |
Translator | :Sayali Godase |
Binding | :paperbag |
Pages | :178 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |