Gulam (गुलाम)
Gulam (गुलाम)
Out of stock
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
‘गुलाम’ हा शब्द अलिकडे आपण फक्त पत्ते खेळताना वापरतो; पण कित्येक शतकं या शब्दानं मानवतेची निव्वळ थट्टा केल्याचा जगतिक इतिहास जाणून घेतला, की या शब्दामधली दाहकता आपल्याला समजेल. पुराणकाळापासून ते आजपर्यंतच्या गुलामगिरीच्या भीषण, दारूण, करुण, अमानवी, जुलमी, महाभयंकर, अत्याचारी इतिहासाची ही सुन्न करणारी सनसनाटी कहाणी आहे. त्यात माणसानं माणसाशी अतिशय क्रूरपणे वागल्याचे असंख्य दाखले तर आहेतच. तसंच लोकांना त्यांच्या वर्णावरून दुय्यम ठरवून त्यांच्यावर जाणिवपूर्वकरीत्या आणि संघटित प्रयत्नांमधून गुलामगिरी लादायची आणि त्यांना त्यातच खितपत पडून राहावं लागेल याची व्यवस्था करणारे वर्चस्ववादीही आहेत. जनावरांपेक्षाही भयानकस्थितीतल्या या गुलामांच्या चळवळींना आणि लढ्याला सलाम करणारी, अमेरिकेच्या वरवरच्या झगझगाटावरचा बुरखा फाडून त्यातले भीषण कंगोरे दाखवणारी, आणि म्हणूनच बराक ओबामांसारखा कृष्णवर्णीय माणूस या जगातल्या सगळ्यात बलाढ्य देशाचा सर्वात मोठा सर्वोच्च नेता बनल्यावर त्याला सलाम करणारी अशी ही सफर आहे.
ISBN No. | :9789380264653 |
Publisher | :Manovikas Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :376 |
Language | :Marathi |
Edition | :2013/09/10 - 5th |