Akshardhara Book Gallery
Chhatrapati Shambhuraje Krut Nayikabhed,Nakhshikh v Satshatak (Marathi)
Chhatrapati Shambhuraje Krut Nayikabhed,Nakhshikh v Satshatak (Marathi)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr.Prabhakar Takavale
Publisher: Jijai Prakashan
Pages: 119
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
छत्रपती शंभूराजे कृत - नायिकाभेद, नखशिख , व सातशतक - एक सिंहावलोकन
धीरवीर व पुण्यश्लोक श्री शिवरायांचे सवाई वारसदार, तेजोदीप छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रत्युत्पन्नर्मात 'बुधभूषण' या सार्थ स्वकुलवर्णनाच्या मार्मिक वंदनांच्या अन्योक्तिवृंदानंतर अनेक पूर्वसूरी दंडनीतिज्ञ पंडितांच्या संस्कृत कोषागारातील वचनांच्या मार्मिक मागोवा घेतलेल्या जवळपास सहस्त्र श्लोकांचे मराठी भाषांतर शिव-शंभू कृपेने आम्ही सर्वदूर पसरलेल्या मराठमोळ्या भाविकांसाठी सिद्ध केले. त्या कृपाप्रसादानंतर श्री शंभूराजांच्या शेष तीन हिंदी ग्रंथाकडे (नायिकाभेद, नखशिख व सातशतक) आम्ही वळलो. महाराष्ट्रातील धांडोळ्यात जेवढी पदे हाती लागली ती या हिंदी त्रयदलात अनुवादली आहेत. शेष पदासाठी श्री शंभूप्रेमींसह, मधुसंचय जारी आहे. तोपर्यंत ही त्रिदलातील पानफुले मनोभावे, दुसऱ्या पूजेसाठी ठेवून घ्या. त्यांचा प्रभाव सुगंध खचितच वाचकास आगळा-वेगळा अनुभव देईल. धागे से पता चलेगा ताग किस का है!
प्रकाशक : जिजाई प्रकाशन