Gaonkhori (गावखोरी)
Gaonkhori (गावखोरी)
Low stock: 4 left
Author:
Publisher:
Pages: 308
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
या कादंबरीत सुशिक्षित तरुण नायकाच्या संघर्षाच्या प्रवासाबरोबर बेलदार समाजाच्या व्यथावेदनांचा चित्रफलक आहे. तो सुखद आणि शांतविणारा नाही. तर तो कमालीचा दुःखद आणि अस्वस्थ करणारा आहे. बेलदार समाजातील 'आज'च्या प्रश्नांची मांडणी करणारी ही कादंबरी आहे. त्यामुळे ती अनेकमुखी झाली आहे. या कादंबरीत दोन दशकातील समता चळवळीबरोबर संविधानमूल्यांच्या चर्चेचे, जातीय-धार्मिक- अस्मिता रंगांचे विविध 'आवाज' ध्वनीत झाले आहेत. आत्मपर आणि संवादशैलीतून घडविलेले हे भटक्या समाजाचे शोकांतकथन आहे. 'हे स्वातंत्र्य कोणत्या हरामखोरांनी गाभडवलं रे' असा प्रश्न उपस्थित करणारी ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी आहे. - प्रा. रणधीर शिंदे
या पुस्तकाचे लेखक : अशोक पवार, प्रकाशक : लोकवाङ्मय गृह