Akshardhara Book Gallery
Sarvottam Bhumiputra : Aakshep ( सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप )
Sarvottam Bhumiputra : Aakshep ( सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप )
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr A H Salunkhe
Publisher: Lokayat Prakashan
Pages: 264
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
सर्वोत्तम भूमिपुत्र : आक्षेप
डॉ. आंबेडकरांची विचारधारा आणि लेखकाची भूमिका
आ.ह. साळुंखे यांच्या ‘ सर्वोत्तम भूमिपुत्र : गौतम बुद्ध’ या पुस्तकातील मांडणीवर काही जणांनी वेगवेगळे आक्षेप घेतले आहेत. आंबेडकरवाद, बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांची विचारस्वातंत्र्याबद्दलची भूमिका, संत तुकाराम – शिवाजी महाराज – महात्मा फुले यांच्याविषयीची भूमिका, बहुजन संज्ञा, शेतकऱ्यांविषयीची व शेतीशी संबंधित विविधजातींविषयीची भूमिका, धर्मांतर, निब्बान,आत्मा, बाबासाहेबांनी धम्मविषयी मांडलेल्या चार समस्या, बुद्धांना लावलेले ‘स्थितप्रज्ञ’ हे विशेषण, गोतम या पाली शब्दाचा प्रयोग, ‘सिद्धार्थ’ या शब्दाचा अर्थ, सिद्धार्थाच्या जन्मवर्षाची चर्चा, कर्मकांड- ध्यान- समाधी- विपश्यना या संकल्पना, सिंधू संस्कृती, बळीराजा, संस्कृत आणि पाली भाषा, अशा अनेक मुद्द्यांवरील मांडणीबद्दलचे आक्षेप आणि त्याविषयीची लेखकाची भूमिका यांचर सविस्तर विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकू शकणारी स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मते काय होती, ते स्पष्ट व्हावे म्हणून त्यांच्या मतांची विपुल अवतरणे या पुस्तकामध्ये देण्या अली आहेत. वरील मुद्द्याच्या बाबतीत मनात जिज्ञासा असलेल्या व्यक्तींच्या दृष्टीने बुद्धांना आणि बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी देखील हि सर्व मांडणी उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे.
प्रकाशक : लोकायत प्रकाशन