Savalicha Shodh ( सावलीचा शोध )
Savalicha Shodh ( सावलीचा शोध )
Share
Author:
Publisher:
Pages: 172
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'ख्रिस्ती धर्माच्या आगमनामुळे महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक जीवनात निर्माण झालेल्या ताण-तणावांचे वस्तुनिष्ठ, अधिकृत असे दर्शन आपल्याला या पुस्तकातून घडते. चपळगावकरांची भूमिका या घटनांचे आणि मतांचे मूल्यमापन करणारी नसून त्यांना जन्म देणार्या परिस्थितीचा शोध घेण्याची आहे. म्हणून, त्यांनी या ग्रंथातील निवडलेल्या व्यक्तींचे मानस, त्यांना घडवणारी सामाजिक परिस्थिती, त्यांच्या कार्यामागील प्रेरणा इच्छित कार्य करताना त्यांना करावा लागलेला संघर्ष, त्यांच्या मनात निर्माण झालेले ताणतणाव, त्यांच्या कार्याचे समाजावर होणारे अनुकूल-प्रतिकूल परिणाम आणि या सर्वांतील नाट्य याचे मनोवेधक चित्र रेखाटण्यात चपळगावकर पूर्णत: यशस्वी झाले आहेत.
या पुस्तकाचे लेखक : नरेन्द्र चपळगावकर , प्रकाशक : मौज प्रकाशन